Tour galat aahe

tour galat aahe

मोहर येण्याच्या अवस्थेत तुडतुडे व भुरी रोगांचा प्रदुर्भाव् मोठ्या प्रमाणात होतो. तसेच संपूर्ण फुलोऱ्या (मोहर) पैकी केवळ १% फळे येतात उर्वरित मोहर गळून पडतो.

कीड व रोगांच्या नियंत्रण करिता सल्फर @४० ग्रॅम + अॅक्ट्रा @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मोहर व्यवस्थापन
१) मोहर/ फळगळ कमी करण्यासाठी प्लनोफ़िक्ष @४ मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( मोहर आल्यापासून ते फळ सेटिंग पर्यंत २ फवारणी करावी).

अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात फळांची गळ होते. ही फळगळ रोखण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट 1 टक्का (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. तसेच फळांच्या विविध अवस्थेत युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) अधिक एन ए ए (प्लानोफ़िक्क्ष )@३ मिली १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.