कांदा थ्रिप्स

थ्रिप्स कंन्ट्रोल होत नाही. १) साफ (कार्बेन्डाझिम, मेनकोझेब) +हमला (क्लोरो,सायपर)+अॅमिनो अॅसिड २) अँट्राकोल (प्रोफीनेब) + फॉलीक्युअर (टुबॅकोनॅझोल) ३) रिजेंट (फिप्रोनील) +सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड) + मॅनेक्स (मेटालाझिन+मेनकोझेब) ४) अॅसिफेट 75% SP +टास्पा (प्रॉपीकोनॅझोल+डिफेनोकोनॅझॉल EC) + अरेवा (थिमॅथॉक्सम ओ 25% WG) + सिलीकॉन इ. फवारण्या झाल्या आहेत. तरीही थ्रिप्स कंन्ट्रोल होत नाही

1 Like

गोकुळ जी जम्प नावाने भेटत बाजारात ( फिप्रोनिल ८०%) घटक आहे त्या मध्ये त्याची एक फवारणी घ्या @४ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लगेच एक आठवड्यांनी lambda cylhothrin ५%( कराटे)@१५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
यात केवळ स्टिकर मिश्रण करावे यात कुठले दुसरे कीटक नाशके मिश्रण करू नये तरच अपेक्षित नियंत्रण मिळेल

1 Like

तुम्ही ज्या फवारणी केलेल्या आहेत त्या पैकी ३ व ४ फवारणी thrips साठी योग्य होत्या.
त्यात जर केवळ एकच औसध घेतले असते तर परिणाम छान भेटला असता तुम्ही एका दोन बुरशीनाशके व दीन कीटकनाशके एकत्र मिश्रण केल्याने अपेक्षित परिणाम मिळाला नाही तुम्हाला.

1 Like