अळी नियोजन


ज्वारी वर अळी पडली आहे, तरी उपाय योजना सुचवा.

अमेरिकन लष्करी अळी आहे एकात्मिक नियंत्रण करिता @२० पक्षी थांबे खांब उभी करावी.
व तसेच एकरी @२० कामगंध सापळ्याचा वापर करावा.आकाराने मोठ्या दिसणाऱ्या अळ्या हाताने वेचून नष्ठ करावी. जर लष्करी अळी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (5% प्रादुर्भाव )तर खालील कीटकनाशकाची
फवारणी करावी.
१) क्लोरोपायरीफॉस ५० %+ सायपरमेथ्रीन ५ %SC(हमला ) @२० मिली
२)क्लोरँट्रॅनीलीप्रोल १८.५ SC**( कोराजन )** @३ मिली
वरील सर्व मात्रा १० लिटर पाण्यासाठी देण्यात आलेली आहे.
फवारणी करताना औषधे पिकाच्या पोन्ग्यात जाईल याची काळजी घ्यावी.