उसाचे वाळलेले पाने काढणे फायदेशीर

उसाचे वाळले पाणी काढून टाकल्याने काय काय फायदे होऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती द्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते का जर होऊ शकत असेल तर किती होऊ शकते किती टक्के पर्यंत होऊ शकते ही पण माहिती द्यावी लागवड ही 12 जून रोजी केलेली आहे आता सध्या पाच कांडीवर ऊस आहे त्यासाठी कुठला खताचा डोस दिला पाहिजे त्याची पण माहिती द्या या आदी दिलेली खते फक्त शेणखत हेच आहे अजून रासायनिक खताचा वापर केलेला नाही

1 Like

फोटो अपलोड होत नाहीत काही तांत्रिक स्वरुपाच्या अडचणी येत आहेत असे वाटते.

पाचट काढण्याचे फायदे:
पाचट काढल्याने पानाची संख्या नियंत्रित राहते त्या मुळे उसाची कांडी पोसण्यासाठी अन्नद्रव्ये उपलब्ध होत असते. बुडातील पाचट निघाल्याने हवा खेळती राहते त्यामुळे उसाची जाडी वाढण्यास मदत होते. कधीकधी कांडी कीड ची कोश अवस्था वर नियंत्रण सुधा मिळवता येते.
सुरुवातीला वाळलेले पाने काढलेली की ते पाणे पुढे चालून कुजत असते. यामुळे उन्हाळ्यात याचा आपण अच्छादन चां वापर करता येते परिणामी उन्हाळ्यात लागणाऱ्या पाण्यात बचत होते.

ऊस पिकाच्या एक हेक्टर क्षेत्रामध्ये सुमारे दहा ते बारा टन वाळलेले पाचट मिळते.
ते एक आड एक सरित् ठेवून कुजवल्यास पाच ते सहा टन सेंद्रिय खत मिळू शकते.
पाला / पाचाट विघटन झाल्यास ऊस पिकाना ४० ते ५० किलो नत्र , २० ते ३० किलो स्फु रद ७० ते ८० किलो पोटॅश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये कॅल्िअम, मॅग्नेशियम, गंधक, लोह ,तांबे आणि जस्त ही अन्नद्रव्ये पिकांना मिळू शकते.
या मुळे १०-१५% पर्यंत उत्पादनात वाढ होते.