जीवामृत कसे बनवावे

जीवामृत कसे बनवावे त्याची माहिती द्या सर

जिवामृत बनविण्यासाठी गावरान गुळ चार किलो, हरभरा पिठ दोन किलो, गाईचे शेणखत चाळीस टोपली, हुताची माती दहा टोपली, पाणी साठ लिटर,चाळीस लिटर ताक,गाईचे गोमूत्र विस लिटर असे द्रावण एका दोनशे लिटरच्या बँरल मध्ये मिश्रण एकजीव करावे ते तसे एकजीव सात ते दहा दिवस ठेवावे व दररोज सकाळी व सध्याकांळ मिश्रण एकजीव करावे व दर पधंरा दिवसांनी पिकांना द्यावे.।।।।

देशी गाईचे शेण -१० किलो
बांधावरची माती उंबर किंवा पिंपळ झाडाखालची माती -४ किलो
देसी गाईचे गोमूत्र -१० लिटर
गूळ - २ किलो
कडधान्य पिठ ( हरभरा, तूर, चवळी, मूग) -२ किलो
वरील सर्व द्रावण एकत्र मिश्रण करून एका २०० लिटर पाण्याचा टाकीत टाकावे त्यात १७० लिटर पाणी टाकावे. दररोज सकाळ संध्याकाळ काठीने हलवत राहावे असे एक महिना करत रहा एका महिन्यानंतर छान प्रकारे जीवामृत तयार होते.