मका बियाणे वापरणे

सर माझी मका सोंगणी (काढणी) चालू आहेत . मका बिट्टि खूपच चांगली आहेत तर माझा प्रश्न असा आहेत की 1)मला एक एकर मका परत लागवड करायची आहेत तर मी फोटोत दाखवलेले मका बियाणे वापरू शकतो का ??
2)गहू आणि सोयाबीन चे बियाणे दोन वर्ष आपण वापरतो पण मका विषयी माहिती द्या.म्हणजे मी या बियाण्याला बिजप्रक्रिया करूनच वापरणार यात शंका नाही .
3)वरीलप्रमाणेच बियाणे वापरता येत असेल तर उत्पादनात घट येऊ शकते का ?
4)वरील विषयान्वे सविस्तर माहिती मिळावी हि अपेक्षा

5 Likes

जात कोणती आहेत

मका ची जात कोणती आहे कळेल का , की हायब्रीड आहे कंपनी कोणती ?

1)Bhaginath जी यात मका पिकाचे दोन प्रकार पडतात
एक म्हणजे १) हायब्रीड आणि दुसरी म्हणजे २) variety.
2)साधारण आपण ज्या variety असतात ते दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी लावू शकतो आणि जर हायब्रीड असेल तर तुमची मका हायब्रीड असेल तर ते वापरता येत नाही.
हायब्रीड आपल्याला लावता येत नाही कारण ते बियाणे कंपनी बनवते. हायब्रीड आपण केवळ एकच वर्ष वापरतो दुसऱ्या वर्षी वापरू शकत नाही त्याचे कारण म्हणजे जरी आपण दुसऱ्या वर्षी घेतले तर खूप फरक आढळून येईल जसे झाडांची उंची कमी जास्त राहणे, मका ची biti कमी जास्त भरणे , उत्पन्नात घट होणे अशी बरीच कारणे आढळून येतात.
3) जसं तुम्ही विचारल्या प्रमाणे सोयाबीन , गहू , हरभरा इत्यादी ही पिके Self pollination पिके आहेत या पिका मध्ये आपण जास्त हायब्रीड बनवत नाही त्यामुळे त्या पिकाचे बियाणे तीन वर्ष पर्यंत वापरू शकतो.

मका मध्ये सध्या variety उपलब्ध नाही जर लावायची असेल मका तर घरचं बियाणे वापरू नका, Dutch ( Adventa ), DKC-9141 या हायब्रीड cha वापर करू शकता.

हि मका होती

नाही घेऊ शकत bhaginath जी, रब्बी साठी घ्याची असेल तर नवीन बॅग ची लावणी करू शकता.

म्हणजे हायब्रीड परत चालत नाही फक्त गावरान किंवा सत्य प्रत बियाणे परत परत वापरता येते.

बर चालन नविनच बियाणे घेतो मग