वांगी

2 महिन्यांपूर्वी लागवड असलेल्या पंचगंगा जातीचे वाण असलेले वांगी आहे यावर कोराजन 3 वेळा फवारणी केली आहे मात्र यातील शेंड्यामधे आळी होऊन शेंडे वाळतात अळीचे प्रमान 30 ते 35 %आहे उपाय सुचवा

1 Like

कामगंध सापळे लावा आणि शक्य असल्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करा,
शेंडे वाळलेले आणि खाली पडलेले वांगे गोळा करून नष्ट करावे.
एकात्मिक नियंत्रण केल्या शिवाय शेंडे अळी चे नियंत्रण होत नाही.
नंतर ट्रेसर @५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.