सोयाबीन पिवळी पडली आहे

माझी सोयाबीन पिवळी पडली आहे मी काय करायला पाहिजे

4 Likes

सध्या बऱ्याच ठिकाणीं पाऊस भरपूर आहे आणि सोयाबीन पिवळी पडत आहे त्याचे कारण असे की जमिनीत सतत पडत असलेल्या पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही ,पाणी साचून राहत असल्याने जमीन वापसा अवस्थेत आली नाही , त्या मुळे आंतरमशागत करता आली नाही, अजून एक महत्वाचे म्हणजे वरील पाने पिवळी लोह आणि गंधक या मूलद्रव्याच्या कमतेऱ्येने पिवळी पडतात. आणि दुसर म्हणजे जी चुनखडीयुक्त जमीन आहे त्या जमिनीत जास्त प्रमाणत पिवळी पडताना दिसून येत आहे.
उपाययोजना :
१) जमिनीत सतत साचलेले पाणी चर काढून बाहेर काढावे
२) आंतरमशागतीय कामे करून घावी जसे की कोळपणी,
३) १३:४०:१३@५० ग्रॅम/१० लिटर पाणी सोबत चीलिटेड फेरस सल्फेट@ २० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) सोयाबीन पिकात पुढील काही दिवसांत खोड माशी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येईल त्या करिता ट्रायफोस ४०% ईसी @३० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लेखक :
सचिन आढे
:droplet::droplet:वॉटरशेड ऑर्गायझेशन ट्रस्ट ,पुणे:droplet::droplet: :ear_of_rice::ear_of_rice::ear_of_rice::ear_of_rice::ear_of_rice::ear_of_rice::ear_of_rice::ear_of_rice:

thank

pani sathle hote ka