कपाशी वरील पाते व बोंडे

कपाशीवर सध्या पाते खुप प्रमाणात आहे. पाते गळ न व्हावी यासाठी कोणते औषध फवारणी करावी

अमोल जी Planofix (NAA)@५ मिली सोबत बोरॉन @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

एका आठवड्यानंतर एक बुरशीनाशक , Abic (Moncozeb ७५%)@३० ग्रॅम आणि ०:५२:३४@५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लाल्या चे नियंत्रण करण्यासाठी दोनशे ग्रॅम युरिया किंवा 200 ग्रॅम डीअेपी दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पाट्या धरताना 50% फुलं लागल्यानंतर व बोंडे पक्व होताना मॅग्नेशियम सल्फेट दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. - डॉ. आनंदा वाणी