रमेश टकले लो भायगाव

माझ्या शेतात मी मोसंबीचे 200 रोपे लावली आहेत तरी त्याची वाढ होण्याकरता कोणता खताचा डोस व कोणते औषध फवारणी घ्यावी मी ह्याच्या अगोदर शेणखताचा एक डोस दिलेला आहे व निंबोळी अर्काची फवारणी व दशपर्णी ची फवारणी केलेली आहे

1 Like

रमेश जी मोसंबी ची वाढ खूप हळु हळू होते , शक्य असल्यास प्रती रोपे २ किलो शेणखत आणि आणि १०० ग्रॅम dap खत एकत्र करून टाकावे.
अधूमधून जीवामृत सोडत राहावे.

कपाशीवरील पाल्यांची गळ होऊ नये यासाठी नॉक लिव्ह ऍसिटिक ऍसिड (प्लानोफिक्स ) या संजीवकाची 20 मिली शंभर लिटर पाण्यात मिसळून पात्या लागल्या असतील तेव्हा पहिली फवारणी करावी दुसरी फवारणी त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी करावी. - डॉ. आनंदा वाणी

वरीेल उत्‍तर चूकून पोस्‍ट झाले असून तुमच्‍या प्रश्‍नाचे अचुक उत्‍तर हे आहे की, मोसंबी लागवडीचे पहिलेच वर्ष असेल तर प्रत्येक झाडास शेणखत दहा किलो निंबोळी पेंड अर्धा किलो व युरिया 150 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट तीनशे ग्रॅम व म्युरेट ऑफ पोट्याश १५० ग्रॅम याप्रमाणे घ्यावे - डॉ. आनंदा वाणी