कांदा पिकामध्ये पिवळे पान पाडूनये यासाठी उपाय

कांद्याला वाढीसाठी व बनण्यासाठी कोणते औषध वापरावे.

1 Like

करपा आणि फुलकिडे या दोन्ही मुळे पात पिवळी पडतात.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी साफ बुरशीनाशक ( Carbendezim १२% Moncozeb 63%)@३० ग्रॅम आणि सोबत Fipronil ५%sc( Agadi, Rigent, महावीर) @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सर जे सांगितले त्यापैकी फक्त साफ मिळाले जर साफ आणि कराटे वापरले तर चालेल ka?

अंकुश जी कराटे कीटक नाशक आहे आणि साफ बुरशीनाशक आहे

चालेल पण जास्त अपेक्षित परिणाम भेटणार नाही.

ओके सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे दोन दिवसात फवारणी करतो.

सर खत सध्याला कोणते वापरू मार्गदर्शन करा.

आधी कुठले खत वापरले होते.

16:12:32 हे खत वापरले आहे. त्याला 35दिवस झाले आहे. सर मला असे वाटते कि माधनचे 18:46 वापरावे किंवा नाही हे सांगा.

चालते अंकुश जी त्यात 30किलो पोटॅश मिसळून वापरावे.