करपा जास्त आहे काय उपाय करावा?

मागील आठवड्यात अद्रक हिरवी होती या आठवड्यात जास्त पिवळी झालीय काय उपाय करता येईल, शेंडा पण जास्त पिवळा होऊन भाजतोय, प्लॉटला 6 दिवसापूर्वी 10.26.26, 20.20.0.13, लिंबोळी पेंड, 10 kg गंधक टाकले, तरीही अद्रक जास्त पिवळी झालेली दिसतेय.

2 Likes

नेटिओ फवारणी

सुरेश जी सतत च ढगाळ वातावरण आणि अधून मधून रिमझिम पाउस व तसेच अपूर्ण सुर्य प्रकाश अशी बरीच कारणे कारणीभूत ठरतात करपा रोगासाठी.
शक्य असल्यास सकाळ संध्याकाळ काडीकचरा जाळून पिकाच्या अवती भोवती धूर करावे.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी Netio @१० ग्रॅम सोबत streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

दिलेल्या प्रतिक्रियेबाबत धन्यवाद :pray:

यामध्ये कराटे आणि BIO 303 टाकले तर चालेल का ?

बायो चे अपेक्षित परिणाम या वर्षी मिळत नाही सुरेश जी मागच्या वर्षी chya तुलनेत.

जास्त कीटकनाशक एकत्र मिसळून फवारणी केली की पाहिजे तसा परिणाम सुधा मिळत नाही आणि आपले पैसे सुधा वाया जातात तसेच जास्त एकत्र मिश्रण केली की पानावर scarching पण येऊ शकते.

कराटे सोबत Chilited micronutrients वापरा@२० ग्रॅम ने.

Netio + streptocyclin ही फवारणी घेतो उद्या आणि नंतर कराटे ची फवारणी करतो, ती किती दिवसांनी करावी लागेल

Netio + streptocyclin आळी आणि भनक जाईल का

netio आणि streptocyclin मुळे करपा रोग नियंत्रित होईल.
कराटे मुळे अळी नियंत्रित होईल

ठिक आहे कराटे ची फवारणी किती दिवसांनी करावि?

Netio आणि streptocyclin ची फवारणी झाल्यानंतर ३ दिवसांनी त्यात फेरस सल्फेट@२० ग्रॅम ने घेतले तर चालेल.