सोयाबीन पिक 18 दिवसाचे आहे ,पिवळे पडत आहे

या विषयावर सविस्तर माहिती द्यावी.

4 Likes

तणनाशकाचा वापर केला होता का?

किंवा जर जमिनीत पावसाचं पाणी साचून राहत असेल तरी सुध्धा पिवळी पडू शकते

जर तणनाशक फवारले असतील तर सोयाबीन पिकाला शॉक बसतो , recovery साठी अमिनो आम्ल + 19:19:19 विद्राव्य खत @50 ग्रॅम /10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

photo send kara

सध्या बऱ्याच भागा मध्ये
सोयाबीन वरती अन्न द्रव्य कमतरता दिसत आहे ह्या मुळे
शेतकऱ्याचे सोयाबीन पिवळे पडणे ह्या सारखी समस्या येत आहे
काही शेतकऱ्यांन मध्ये असा गैरसमज आहे कि हा वायरस, बुरशी किवी येल्लो मोसॅक आहे.
अन्न द्रव्य यांच्या कमतरते मुळे येत आहे.
मुख्यतः यामध्ये झिंक, फेरस, आणी पोटॅश ची कमतरता आहे.ह्यामुळे तुमचे सोयाबीन पिवळे पडणे अशी समस्या होत आहे. हि समस्या मुख्यतः कमी किंवा जास्त पावसामुळे येते. किंवा चुनखडी युक्त जमिनी मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो.
तर हा प्राब्लेम दूर करण्या साठी तुम्ही चांगल्या गुणवत्ते चे झिंक आणी फेरस वापरावे जेणे करुन कमी कालावधी मध्ये चांगले परिणाम मिळतील खालील प्रमाणे औषधी वापरावी
**झिंक एक ग्राम प्रति लिटर पाणी
फेरस एक ग्राम प्रति लिटर पाणी
तसेच एम45 दोन ग्राम प्रति लिटर पाणी
झिक तसेच फेरस हे चांगल्या कंपनी चे असायला हवे

1 Like