दोन महिने डाळिंब लावून झाले कोणते खत वापरावे लागेल

डाळिंब ला कोणते रासायनिक खत टाकायला चालेल दोन महिने लावून झाले

1 Like

डाळिंब बाग एक वर्षाची असेल तर 125 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम स्फुरद व 125 ग्रॅम पालाश प्रति झाड द्यावे. त्यासाठी 270 ग्रॅम युरीया, 780 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 215 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटाश द्यावे. किंवा 480 ग्रॅम 10:26:26 आणि 170 ग्रॅम युरिया प्रति झाड द्यावा.
गांडूळ खत 1 किलो + कंपोस्ट खत 2 किलो प्रति झाड द्यावे.
जीवामृत स्लरी 1 लिटर प्रति झाड या प्रमाणे आळवणी 15-20 दिवसांच्या अंतराने घालावी.
माती परीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची खतमात्रा वापरावी.