तुर लागवडीस शेद्रियखते बदल माहिती द्या

तुर लागवडीस शेद्रियखते बदल माहिती द्या

1 Like

कसा फायदा

शेण खत (१०टन/हे.) जमिनीची मशागत करताना जमिनीमध्ये मिसळावे.
रायझोबियम व पी एस बी प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
जीवामृत स्लरी 15-20 दिवसांच्या अंतराने एकरी 200 लिटर याप्रमाणे घालावी.
अमृतपाणी १५० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी पेरणी नंतर 15, 30 व 45 दिवसांनी करावी.
वर्मीवॉश 500 मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी पेरणी नंतर 60 व 75 दिवसांनी करावी.

उन्हाळी भुईमूग कोणता पेरावा वाणाची माहिती सांगा

उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी TAG- २४, दप्तरी वाणाची शिफारस केलेली आहे.