पाने पिवळे पडली आहे

पपई पाने पिवळे पडली आहे उपाय सुचवा
फुले आलीआहे

3 Likes

पपई वरील विषाणूजन्य व्हायरस आणि त्या वरील उपाय योजना.
शेतकरी बंधूंनो पपईवरील रिंग स्पॉट व्हायरस हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगामुळे पपईचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.महाराष्ट्रात हा रोग मोठ्या प्रमाणावर पपई वर आढळून येतो. सर्वप्रथम या रोगाची लक्षणे समजून घेऊ. या रोगात पानावर पिवळसर चट्टे पडतात शिरा मात्र हिरव्या राहतात पाने आकसतात व पानाची तसेच झाडाची वाढ खुंटते. पानाच्या देठावर व खोडाच्या कोवळ्या भागावर तेलकट ठिपके दिसतात. फळधारणा कमी होते किंवा होत नाही. फळे न वाढता वाळून पडतात साधारणपणे पपईच्या झाडावर पहिली फळधारणा होते आणि फळांची वाढ होत असते त्यावेळी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.फळावर बांगडी च्या आकाराचे किंचित उठावदार ठिपके दिसतात सुरुवातीला ठिपक्याचा आकार एक मिलीमीटर असतो नंतर तो चार ते आठ मिलिमीटर होतो. फळाची वाढ होत नाही व ती वाकडीतिकडी होतात. या रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असलेला विषाणू काकडी वर्गीय पिकात आढळतो आणि मावा या कीटकांमुळे या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. कलिंगड काकडी चवळी बटाटा या पिकावरील मावा कीटक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पपईवर करतात. हा विषाणू पपईच्या संपूर्ण झाडाच्या विविध भागात विशेषता वरील भागात असतो परंतु बियात नसतो.

उपाय योजना:
पपईची लागवड करताना या रोगाच्या प्रतिबंधासाठी पपईच्या चारही बाजूने चार लाईन मक्याच्या लवावे. शेतकरी बंधुंनो पपई पिकावर रिंग स्पॉट व्हायरस ची लक्षणे दिसून येतात पहिले एकटी दुकटे रोगग्रस्त झाड उपटून ताबडतोब नष्ट करावे. शेतकरी बंधूंनो पपई पिकावर रिंग स्पॉट व्हायरस या रोगाचा प्रसार मावा किडीमुळे होत असल्यामुळे या किडीच्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच निंबोळी तेल 100 ते 125 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करावी निंबोळी तेल फवारणी करताना स्टिकर चा वापर करावा.

yala welchya weli Ras shoshak किडीचे नियंत्रण karawe lagte. vishanujany rog alyawar lawkr control hot nhi.