कामगंध सापळे वापरून करा एकात्मिक कीड नियंत्रण

कामगंध सापळे वापरून करा एकात्मिक कीड नियंत्रण.
Helicoverpa armigera :bug::bug::bug:
ही एक बहू पिके खाणारी अळी आहे. या किडी एक वैशिष्ट्य आहे ती ज्या पिकावर उपजीविका करेल त्या पिकासारखा या किडीचा अळी अवस्थेचे रंग बदलेले दिसतात. या किडीच नियंत्रण कामगंध सापळ्या मार्फत केल्यास लवकर नियंत्रण मिळवता येते. कामगंध सापळ्या मार्फत नियंत्रण करिता हेलिलूर वापरतात. त्या लुर मध्ये मादीचा किडीचा गंध टाकलेला असतो त्या शोधात नर पतंग सापळ्यात अडकून पडतो.सापळ्यात अडकलेली पतंग व्यवस्थित नष्ट करावी. त्या मुळे नर मादी किडीचा मिलन होणार नाही आणि मादी कोवळ्या पिकात अंडी घालणार नाही.
या अळीचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी खालील पिकात कामगंध सापळ्यांचा वापर करावा :
कापूस
तूर
मूग
उडीद
मका
ज्वारी
टोमॅटो
मिरची
भेंडी
हरभरा
सोयाबीन
सूर्यफूल
तीळ
करडी इत्यादी…
कामगंध सापळ्यांचा वापर करून कमी खर्चात किडीचं नियंत्रण करता येते , विषारी कीटकनाशके फवारणी ची गरज टाळता येते , आपल्या पीक स्वरक्षण खर्चात बचत करता येते…##
सचिन आढे WOTR

2 Likes

धन्‍यवाद