मावा रोग नियंत्रण कसे करावे

कपाशी पिकावर मावा चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला आहे यावरती उपाय सुचवा

Preventive:-

  • किडींची जीवन साखळी विस्कळीत करण्यासाठी उन्हाळ्यात खोल नागरणी करावी.
  • मावा प्रतिकार क्षम वाणांचा वापर करावा. म्हणजे एनएचएच -४४, अजित १४५.
  • सुरवातीच्या काळात मावा किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ७० % डब्ल्यूजी @ ७ ग्रॅम / किलो बियाणे किंवा थायामेथोक्‍झाम ३० % एफएस @ १० ग्रॅम / किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
  • आंतरपीक म्हणून कापूस + चवळी ६:१ या प्रमाणात लावावे.
  • पिवळे चिकट सापळे एकरी २० या प्रमाणे शेतात लावावेत.
  • तुडतुडे वर उपजीविका करणाऱ्या ढाल्या किड व ग्रीन लेस विंग या परभक्षी कीटकांचे संवर्धन करावे.
  • नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा.

Curative :-

  • मावा किडीच्या नियंत्रणासाठी ५% निंबोळी अर्काची पंधरा दिवसातून एकदा फवारणी करावी.
  • मावा किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क @ १५० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
  • जर मावा किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर ( १५ % प्रादुर्भाव ग्रस्त झाड किवा ५ मावा प्रति पान) खालीलपैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी.
  • डायमेथोएट ३०% ईसी २० मिली / १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
  • इमिडाक्लोप्रिड १७.८ % एसएल @ २० मिली / १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
  • थायामेथोक्‍झाम २५ % डब्ल्यूजी @ ५ ग्रॅम / १५ लिटर पाण्यात फवारणी करा.
  • डायफेन्थुरान ५०% डब्ल्यूपी @ २० ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
  • बुप्रोफेझीन २५% एससी ३० मिली /१५ लिटर पाण्यात फवारणी करा.
  • अ‍ॅसीफेट ७५% एसपी ३० ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.