Preventive measure:-
- पिक काढणीनंतर उन्हाळ्यात खोल नांगरट करावी.
- मावा किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्राईड ७०% डब्लूएस @७ग्रॅम/ प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
- मावा किडीच्या नियंत्रणासाठी फोरेट १०% सीजी @ १० किलो /प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसळून द्यावे.
- मुख्यपिकासोबत आंतरपीक म्हणून चवळी (६:१) या प्रमाणे लागवड करावी.
- मावा किडीच्या नियंत्रणासाठी एकरी @२० चिकट सापळे स्थापित करावे.
- मावा प्रादुर्भाव ग्रस्त शेंडा आणि झाड काढून नष्ठ करावीत.
- मावा किडीच्या नियंत्रणासाठी शेत तण मुक्त तसेच पर्यायी खाद्य पुरवणारी झाडे काढून नष्ठ करावी.
Curative
- मावा किडीच्या नियंत्रणासाठी ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- ढाल किड आणि क्रायसोपा या परभक्षी किडीचा मावा किडीच्या नियंत्रणासाठी वापर करावे.
- मावा किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क @१५० मिली /प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- जर मावा किडीने आर्थिक नुकसानची (५ मावा/प्रति पान) पातळी ओलांडली असेल तर खालील शिफारीश केलेले किटकनाशकाची फवारणी करावी.
- मावा किडीच्या नियंत्रणासाठी अॅसिटामाप्राइड २०% एसपी @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- मावा किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी बुप्रोफेझीन २५% एससी @३० ग्रॅम /प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- मावा किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी फ्लोनिकॅमिड ५०% डब्लूजी @५ ग्रॅम /प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
