गुलाबी बोंड अळी

कपाशी वरील गुलाबी बोंड अळी साठी कोणती औषध फवारणी करावी

1 Like

भाऊ सर्वात पहिले एक काम करा कामगंध सापळे एकरी @20 सापळे लावावे, त्या मुळे नर पतंग सापळ्यात अडकतील आणि मादी कपाशी च्या फुलात अंडी घालणार नाही.

ज्या शेतात डोमकळी ग्रस्त फुल दिसत असेल त्यात 100% अळी असेल ती फुले हाताने तोडून एका पिशवीत भरून ठेवावी आणि ती शेताच्या पार लांब नेऊन ती डोमकळी ग्रस्त फुल नष्ट करावी.

गुलाबी बोंड अळी ग्रस्त फुलांचा ( डोमकळी) चा मी फोटो आपल्या कंमुनिटी फोरम मध्ये टाकण्यात आला आहे ते पाहू शकता.

आता सध्या अम्लीगो हे औषध @5 मिली प्रति पंप घेऊन फवारणी करायची आहे. नंतर 6 दिवसाच्या अंतराने imamectin benzoate @5 ग्रॅम सोबत निंबोळी अर्क 10,000 पीपीएम @२० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सर्वात महत्वाची फवारणी म्हणजे पोळा नंतर येणारी अमावस्या ची आहे त्या अमावास्या च्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसानंतर कोणतेही एक साधारण अंडी नाशक असलेले औषधाची फवारणी करावी.
जसे की 1) thiodicarb 75%wp @20 ग्रॅम
2) प्रोफेनोफोस 50 % ec@20 मिली
किंवा अळी + अंडी नाशक असलेले संयुक्त कीटकनाशक प्रोफेनोफोस 40% + 4% सायपर मेथ्रीन@20 मिली वरील सर्व कीटकनाशक प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.