वांगी पिकाचा शेंडा आणि पूर्ण झाडंच चे पाने चांगले येण्यासाठी उपाय सांगा…
पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त गांडूळखत किंवा चांगले कुजलेले शेणखत @ 250 किलो प्रति एकर वापरावे. त्यासोबत डीएपी @ 25 किलो प्रति एकर जमिनीत मिसळून द्यावे.
पिकामध्ये फुलधारणा, मुळांची वाढ आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी 12:61:00 @ 100 ग्रॅम + अमिनो अॅसिड @ 40 मिली हे 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिकाचे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन (IPM) अवलंबावे. कीड व रोगांचे निरीक्षण करून योग्य व्यवस्थापनासाठी फार्म प्रीसाइज अॅपमधील कीड व्यवस्थापन लायब्ररीचा वापर करावा आणि त्यानुसार शिफारस केलेल्या उपाययोजना राबवाव्यात.