सोयाबीन

सोयाबीन पिकावर पाऊसाचा खंड असल्यामुळे कोणती फवारणी घ्यावी

  • पावसाच्या खंडात पिकाचा पाण्याचा ताण कमी करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी साध्या पाण्याची फवारणी करा किंवा पाणी उपलब्ध असल्यास स्प्रिंकलर चालू ठेवावे.
  • पिकाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी १३:००:४५ (८०-१०० ग्रॅम) सोबत अमिनो ॲसिड फवारावे आणि कीड नियंत्रणात ठेवावी.
  • तसेच, जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी शेतात डवरणी (कोळपणी/Hoeing) करून जमिनीला पडलेल्या भेगा मुजवून घ्याव्यात, ज्यामुळे जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकून राहील.