मका बियाने

स्टार9 मका बियाने कसे आहे . त्याचे एव्हरेज किती?

नमस्कार,

स्टार 9 मका बियाणे हे चांगली उत्पादन क्षमता असलेले संकरित (Hybrid) बियाणे आहे. मात्र, कोणत्याही बियाण्याचे अंतिम उत्पादन हे केवळ वाणावर अवलंबून नसून योग्य पीक व्यवस्थापनावर अवलंबून असते. संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर पेरणी,तण, कीड व रोग व्यवस्थापन तसेच पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास स्टार 9 मका बियाण्यापासून सरासरी 40–45 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळू शकते. अनुकूल हवामान व उत्कृष्ट व्यवस्थापन असल्यास यापेक्षा अधिक उत्पादनही मिळू शकते.