निरीक्षणानुसार पिकामध्ये स्फुरद (Phosphorus) व फेरस (Iron) कमतरतेची लक्षणे दिसून येत आहेत. ही लक्षणे विशेषतः हलकी, चुणखडीयुक्त (कॅल्केरियस) व उच्च pH असलेल्या जमिनीत अधिक प्रमाणात दिसून येतात. तसेच काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा (Fall Armyworm) प्रारंभिक प्रादुर्भाव आढळून आला आहे.
व्यवस्थापन
-
स्फुरद कमतरता भरून काढण्यासाठी कोळपणीपूर्वी डीएपी @ 30 किलो/एकर हे 100 किलो चांगले कुजलेले शेणखत मिसळून जमिनीत द्यावे.
-
फेरस कमतरतेसाठी फेरस सल्फेट @ 20 ग्रॅम + निंबोळी अर्क (1500 ppm) @ 30 मि.ली./15 लिटर पाणी यांची फवारणी करावी. आवश्यक असल्यास 10–12 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
-
अमेरिकन लष्करी अळीच्या निरीक्षणासाठी व नियंत्रणासाठी प्रति एकर 1 प्रकाश सापळा आणि 20 कामगंध (फेरोमोन) सापळे लावावेत व नियमित निरीक्षण करावे.
-
प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा (10% झाडांवर नुकसान किंवा अळीची उपस्थिती) जास्त असल्यास, खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी:
- क्लोरोपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रीन 5% EC (हमला, डबल स्टार, कोरंडा 505) @ 20 मि.ली./15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
