फवारणी सांगा

मिरची कोकडली आहे उपाय सांगा

मिरची पिकासाठी सूचना : किडीचा प्रादुर्भाव जास्त असताना पाण्यात विरघळणारी खते वापरू नयेत

मिरची पिकामध्ये सध्या रसशोषक किडींचा (थ्रिप्स, मावा, पांढरी माशी इ.) प्रादुर्भाव जास्त असल्यास पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा सतत वापर टाळावा.

कारणे पुढीलप्रमाणे :

रसशोषक किडी वाढण्याची शक्यता :
पाण्यात विरघळणारी खते विशेषतः नत्रयुक्त खते जास्त प्रमाणात दिल्यास झाडांची कोवळी व रसाळ वाढ होते. त्यामुळे थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.

मर रोगाचे प्रमाण वाढते :
अति खतांमुळे झाडे अतिशय कोवळी होऊन मर (विल्ट) रोगाचे प्रमाण वाढताना आढळते.

सतत वापराचा अपाय :
15–20 दिवसांतून एकदा योग्य प्रमाणात दिल्यास फायदा होतो; परंतु वारंवार आणि जास्त प्रमाणात दिल्यास त्याचा विशेष फायदा होत नाही. उलट जमिनीत आधीपासून उपलब्ध असलेली अन्नद्रव्ये पीक व्यवस्थित शोषून घेत नाही.

सल्ला :

किडींचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरच संतुलित प्रमाणात पाण्यात विरघळणारी खते द्यावीत.
सध्या किड नियंत्रणावर भर द्यावा व संतुलित खत व्यवस्थापन करावे.
शक्य असल्यास सूक्ष्मअन्नद्रव्ये व सेंद्रिय द्रावणांचा मर्यादित वापर करावा.
संतुलित खत व्यवस्थापन केल्यास किड नियंत्रण सुलभ होते व मिरची पिकाची वाढ निरोगी राहते.
व्यवस्थापन
१) शेतात एकरी @२५ ते ३० निळे - पिवळे चिकट सापळे प्रस्थापीत करावीत.
२) वेळोवेळी फवारणीमध्ये निम ओईल + करंज ओईल प्रत्येकी @३० मिली घेऊन फवारणी करावीत.
३) त्वरित मुख्य पिकाच्या भोवती मका पिकांची लागवड करावी त्यामुळे चुरडा मुरडा रोगांचे प्रादुर्भाव कमी करण्यात मदत होते.