कीड. आणि रोग

हा रोग कोणचा आहे . याचा वर कोणती फवारणी घ्यावी.

मिरची पिकावर फुलकिडे आणि लाल कोळी (रसशोषक) किडीचे मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. केवळ कीटकनाशक पद्धतीवर अवलंबून राहिल्यास किडीवर नियंत्रण मिळवणे कठीण जाते.

व्यवस्थापन:
व्हायरस: मिरची पिकातील व्हायरस नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय (वाहक – थ्रिप्स व पांढरी माशी)

रोपवाटिका अवस्था (Seedling stage):

बियाणे प्रक्रिया: Lecanicillium lecanii @10 मि.ली./100 ग्रॅम बियाणे.

रोपांना Metarhizium anisopliae + Beauveria bassiana @100 ग्रॅम/10 लिटर पाणी याने ड्रेंचिंग करा. (शेतकरी अनुभव)

एकाच पिकाची सतत लागवड (Monoculture) टाळा.

मुख्य शेतात पुनर्लागवडीपूर्वी (Transplanting पूर्वी) नीम तेल + करंज तेल @30 मि.ली./10 लिटर पाणी फवारणी करा.

पुनर्लागवडीनंतर (After transplanting):

नीम केक @100 कि.ग्रॅ. + Pseudomonas @1 कि.ग्रॅ./एकर जमिनीत द्या.

Carbofuran 3% CG @2 कि.ग्रॅ./एकर प्रमाणे जमिनीत मिसळा/वापरा.

संक्रमित झाडांचे वरचे टोक (Apical shoot / growing point) कापून नष्ट करा.

Metarhizium anisopliae + Beauveria bassiana @100 ग्रॅम/10 लिटर पाणी याने ड्रेंचिंग करा.

निळे व पांढरे चिकट सापळे (Blue & White sticky traps) @40–50/एकर लावा.

मिरची + मका आंतरपीक 10:1 या प्रमाणात घ्या (नैसर्गिक शत्रूंचे संरक्षण व शोषक किडींवर अडथळा निर्माण करण्यासाठी).

मिरची हे पीक व्हायरस व शोषक किडींना अतिसंवेदनशील आहे, त्यामुळे दर 4–5 दिवसांनी नीम तेल किंवा रिपेलेंटची फवारणी करा.

पुनर्लागवडीनंतर 15 दिवसांनी Benevia (Cyantraniliprole 10.26%) @40 मि.ली./10 लिटर पाणी फवारणी करा.

ETL (Economic Threshold Level) नुसार आवश्यकतेप्रमाणे कीटकनाशकांचा वापर करा.

शिफारस केलेली कीटकनाशके:

a) Broflanilide 300 g/l SC @10 मि.ली./10 लिटर पाणी (व्यापार नाव: Exponus)
b) Cyantraniliprole 10.26% OD @40 मि.ली./10 लिटर पाणी (व्यापार नाव: Benevia)
c) Diafenthiuron 50% WP @20 ग्रॅम/10 लिटर पाणी (व्यापार नाव: Polo / Pegasus)
d) Ethion 50% EC @30 मि.ली./10 लिटर पाणी (व्यापार नाव: Fosmite)
e) Fenpyroximate 5% SC @30 मि.ली./10 लिटर पाणी (व्यापार नाव: Sedna)
f) Fipronil 5% @40 मि.ली./10 लिटर पाणी
g) Fipronil 80% WG @5 ग्रॅम/10 लिटर पाणी (व्यापार नाव: Jamp)

फुलकिडे व कोळी एकत्रित नियत्रण करिता एथिओन ५० % EC @२० मिली किंवा फेन्प्रोपॅथ्रीन ३०% @१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सध्या पाण्यात विरघळणारे खते देणे टाळावे.
प्रत्येक फवारणीमध्ये निंबोळी अर्क आणि सिलिकॉन बेस स्टीकर घेणे आवश्यक आहे.

पाण्यात विरघळणारे खते का वापरृनये

मिरची पिकासाठी सूचना : किडीचा प्रादुर्भाव जास्त असताना पाण्यात विरघळणारी खते वापरू नयेत

मिरची पिकामध्ये सध्या रसशोषक किडींचा (थ्रिप्स, मावा, पांढरी माशी इ.) प्रादुर्भाव जास्त असल्यास पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा सतत वापर टाळावा.

कारणे पुढीलप्रमाणे :

रसशोषक किडी वाढण्याची शक्यता :
पाण्यात विरघळणारी खते विशेषतः नत्रयुक्त खते जास्त प्रमाणात दिल्यास झाडांची कोवळी व रसाळ वाढ होते. त्यामुळे थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.

मर रोगाचे प्रमाण वाढते :
अति खतांमुळे झाडे अतिशय कोवळी होऊन मर (विल्ट) रोगाचे प्रमाण वाढताना आढळते.

सतत वापराचा अपाय :
15–20 दिवसांतून एकदा योग्य प्रमाणात दिल्यास फायदा होतो; परंतु वारंवार आणि जास्त प्रमाणात दिल्यास त्याचा विशेष फायदा होत नाही. उलट जमिनीत आधीपासून उपलब्ध असलेली अन्नद्रव्ये पीक व्यवस्थित शोषून घेत नाही.

सल्ला :

  • किडींचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरच संतुलित प्रमाणात पाण्यात विरघळणारी खते द्यावीत.
  • सध्या किड नियंत्रणावर भर द्यावा व संतुलित खत व्यवस्थापन करावे.
  • शक्य असल्यास सूक्ष्मअन्नद्रव्ये व सेंद्रिय द्रावणांचा मर्यादित वापर करावा.

:point_right: संतुलित खत व्यवस्थापन केल्यास किड नियंत्रण सुलभ होते व मिरची पिकाची वाढ निरोगी राहते.