गव्हाच्या लोंब्या वाळत आहेत

25 नोव्हेंबर ला पेरणी केली आहे. सध्या गव्हाला लोंब्या निघाल्या आहेत परंतु काही ठिकाणी पूर्ण गव्हाचे रोप आणि लोंबी वाळून जात आहे. काय कारणे असावेत आणि उपाय काय करावा

1 Like

खालून गहू उंदीरने कुरतडले असतील किंवा वाळवी असेल ते पहा.
गहू पिकातील उंदीर नियंत्रणाचे प्रभावी उपाय:

  • यांत्रिक पद्धती (Mechanical Methods):
    • बिळे बंद करणे: उंदीर प्रादुर्भाव असलेल्या शेतातील बांध, पाटाच्या कडा आणि बिळे शोधून ती मातीने घट्ट बंद करावीत.
      झिंक फॉस्फाईड (Zinc Phosphide): हे विषारी अन्न म्हणून वापरले जाते. १ भाग झिंक फॉस्फाईड, १ भाग गूळ, आणि ४८ भाग गव्हाचा भरडा किंवा तांदळाचे कणीज मिक्स करून गोळे बनवावेत आणि ती गोळे बिळ असलेल्या शेतात ठेवावीत.
      टीप: रासायनिक औषधे वापरताना हातमोजे वापरावेत आणि लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांपासून ती सुरक्षित ठेवावीत.