पाने खाणारी अळी किंवा भुंगेरे खाल्ल्याने पानावर छिद्र तयार झाले आहे. या किडीने पिकाचे नुकसान होत नाही. प्रतिबंधक उपाययोजना म्हणून शक्य झाल्यास निंबोळी अर्क @१०० मिलि/१५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.