पाणी व्यवस्थापन, INM & IPM बाबत सविस्तर माहिती मिळावी.
हरभरा पिकावर घाटेअळी चे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
तसेच फुलोरा अवस्थेत प्रमुख अन्नद्रव्ये जसे की (नत्र: स्फुरद: पालश व सुक्ष्म अन्नद्रव्ये) ची गरज मोठ्या प्रमाणात भासते.
घाटेअळी व्यवस्थापन:
एकात्मिक नियंत्रण करिता एकरी @२० पक्षी थांबे खांब उभी करावी.
व तसेच एकरी @२० कामगंध सापळ्याचा वापर करावा.
जर घाटे अळीची संख्या आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (१ अळी/प्रति चौ. मीटर )तर खालील किटकनाशकाची फवारणी करावी.
१) इमामेक्टीन बेन्झोइट ५ %SC**( मिसाईल , प्रोक्लेम )** @५ ग्रॅम किंवा
२)स्पिनोसॅड ४५ %SC**( ट्रेसर )** @३ मिली/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन:
१) शक्य असल्यास वर्मीवाश@१५० मिलि/१५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) फवारनीद्वारे खत व्यवस्थापनात १३:५०:१३@१००ग्रॅम + बोरॉन@३०ग्रॅम/१५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
