आंबा

मोहर अजून आला नाही व पानावर असा रोग

पाण्याचा तान झाडांना व्यवस्थित न बसल्याने झाडांना मोहोर उशिरा येतो. केवळ पानांची वाढ होत असते.

तसेच पानांवर दमट वातावरणामुळे आंबा बागांमध्ये गॉल माजी (मिज माशी) या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कोवळ्या पानांवर व पानांच्या शिरांवर लहान फोडसारख्या गाठी अथवा सूज दिसून येते. परिणामी पाने वाळतात, काही वेळा अकाली गळून पडतात. नियंत्रण करिता लॅम्बडा सायल्होथ्रिन 5%@10 मिलि/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.