कांदा लागवडीसाठी बियाणे नेहमी बेडवर टाकावे.नर्सरीकरिता बेडवर सुरूवातीला ट्रायकोड्रामा व्हीरिडी @1 किलो/5 गुंठा सोबत गांडूळखत @50 किलो एकत्रित मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.
सध्या परिस्थितित पावसामुळे मानमोड्या रोगाचे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे.
व्यवस्थापन:
- कॉपर ओक्षिक्लोराईड 50% @500 ग्रॅम/50 लीटर पाण्यात मिसळून संपूर्ण नर्सरीत आळवणी घालावी.
- मेटलक्षिल 35% @40 ग्रॅम + अमिनो अॅसिड @20 मिलि + कॅप्टन @30 ग्रॅम/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- ट्रायकोड्रामा व्हीरीडी @1 किलो + 50 गांडूळखत नर्सरीत सोपवून द्यावे.
