गंधी बग कीड आहे. संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.
लक्षणे :
शेताजवळून चालताना या किडींपासून दुर्गंधी वास येतो, त्यामुळे या किडीस “गंदी बग” असे नाव पडले आहे.
नुकसान :
भात दाणे भरण्याच्या (दुधाळ अवस्थेत) या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.
कीड डासासारखी सोंड खुपसून दाण्यातील दुधासारखा रस शोषून घेते.
दाण्याला छिद्र पडल्यामुळे त्यात बुरशी लागते व दाणे भरत नाहीत.
मोठ्या प्रमाणावर “पळींज” तयार होऊन ५०–७०% पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
उपाययोजना :
1)बांधावरील गवत काढून शेत व बांध स्वच्छ ठेवा.
2)एकरी एक प्रकाश सापळा लावून त्यात अडकलेले प्रौढ किड नष्ट करा.
3)सुरुवातीला निम तेल (१०,००० PPM) ३ मिली/लिटर पाण्यातून फवारणी करा.
4)बिवेरिया बॅसीयाना हे जैविक कीटकनाशक १० मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
5)प्रादुर्भावाची पातळी (एक चुडावर १ कीड) ओलांडल्यास रासायनिक कीटकनाशक वापरावे.
6)धुरळणीसाठी: मिथाईल पराथिऑन २% भुकटी / मॅलॅथीयॉन ५% भुकटी / क्लोरोपायरीफॉस ५% भुकटी यापैकी कोणतेही एक कीटकनाशक ८ किलो प्रति एकर वापरावे.
7)फवारणीसाठी: क्लोरोपायरीफॉस + सायपर (५०%) २ मिली/लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळी फवारणी करावी.