तुती बेणे लागवड करताना करावयाच्या काळजी…
१)बुरशी नाशक बाव्हिस्टिन, कॅप्टॉन १०० ग्रॅम/१ लीटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व त्यात तुती बेणे 4 ते 5 तास बुडवून ठेवाव्यात. त्या नंतर ट्रायकोड्रामा पावडर @२०० ग्रॅम १ लीटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व त्यात तुती बेणे १ ते २ तास बुडवून ठेवाव्यात.
२) तुती कांडीला लवकर मुळे फुटावीत या करिता रुटेक्स पावडर किंवा कॅरडॉक्स पावडर बेण्याच्या खालच्या भागास लावावी त्यामुळे लवकर मुळे फुटून झाडांची जोमदार वाढ होईल.