तुरीला हे काय झाले आहे

20 दिवसाची तूर आहे व गेल्या ५-६ दिवसा पासून हे दिसत आहे. उपाय सांगावा

ग्यालुरीसीड भुंगेराची लक्षणे आहेत.
तुरीची पाने खरडुन त्यावर छीद्र तयार करतात.

व्यवस्थापन:

  1. एक मोठा पाऊस पुरेसा आहे या किडीचे नैसर्गिक नियंत्रण करण्यासाठी.
  2. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आल्यास निंबोळी अर्क @30 मिलि + आलिका (थायमेथोक्सम १२.६% आणि लॅम्ब्डा-सायहॅलोथ्रिन ९.५%)@10 मिलि/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.