फळे तडकण्याची कारणे (डाळिंब पिकात):
-
पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, जमिनीची अयोग्य निवड, हवामानातील अचानक बदल व तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव.
-
जमिनीत नत्र व स्फुरद या मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच कॅल्शियम, मॅग्नेशियम (दुय्यम अन्नद्रव्ये) आणि बोरॉन (सूक्ष्मअन्नद्रव्य) यांची कमतरता.
-
रात्री व दिवसाच्या तापमानातील मोठा फरक आणि आर्द्रतेतील चढउतार.
-
दीर्घकाळ अवर्षणस्थिती राहिल्यानंतर अचानक होणारा पाऊस किंवा एकदम जास्त पाणी दिल्यास फळांची साल ताण सहन करू न शकल्याने ती तडकतात.
उपाययोजना:
-
सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी:
-
एकरी २०० लिटर पाण्यात २५ किलो ताजं शेणखत + ५ लिटर गोमुत्र + ५ किलो फेरस सल्फेट + ५ किलो झिंक सल्फेट + २ किलो बोरिक अॅसिड मिक्स करून आठवडाभर मुरवावे. त्यानंतर ७व्या दिवशी झाडांना स्लरी स्वरूपात द्यावी.
-
फुलोऱ्याच्या टप्प्यावर फवारणी:
-
फुले येण्यापूर्वी आणि ५०% फुलोऱ्यावर चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रीएंट ग्रेड-२ @ १ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी.
-
मल्चिंगचा वापर:
-
बागेत आच्छादन (मल्चिंग) केल्यास जमिनीतील तापमान आणि आर्द्रता संतुलित राहते, त्यामुळे फळे तडकण्याचे प्रमाण कमी होते.
-
कॅल्शियम व बोरॉनची फवारणी व ड्रिपद्वारे देणे:
-
फुलोऱ्यानंतर व फळे लिंबाच्या आकाराची असताना: चिलेटेड कॅल्शियम १ ग्रॅम + बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी.
-
फळ फुगवणीच्या काळात: ५ किलो कॅल्शियम नायट्रेट २०० लिटर पाण्यात मिसळून ड्रिपद्वारे एकरी दोन वेळा द्यावे.