वांग्याची रोपे करपली आहे

वांग्याची रोपे करपली आहे यासाठी कोणती फवारणी करावी ते सांगा :pray:

मर रोगाची आहेत.

लक्षणे:

  • प्रादुर्भाव ग्रस्त झाडे अचानक वाळतात आणि मरण पावतात.

व्यवस्थापन:
नवीन लागवड करत असल्यास खालीलप्रमाणे उपायोजना कराव्यात.

  • रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी जमीन तयार करताना निंबोळी पेंड एकरी @१०० किलो चांगल्या कुजलेल्या ५०० किलो शेणखतात मिसळून एक एकर जमिनीमध्ये मिसळावे.
  • लागवडी च्या अगोदर रोपांची मुळे सुडोमोनास फ्लुरेन्सेसीस @५ मिली /लिटर द्रावणात १० मिनिटे बुडवून ठेवावी.
  • जिवाणू जण्य मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @ १ किलो चांगल कुजलेले २५ किलो शेणखत एकत्र मिसळून एक एकर जमिनीमध्ये मिसळावे आणि त्यानंतर लगेच पाणी द्यावे.
  • रोगाची जिवन साखळी खंडित करण्यासाठी मका, सोयाबीन आणि गहू पिकांसोबत फेरपालट करावी.

सध्यापरीस्थितील उपायोजना
१) उन्हाळ्यात झाडांना पुरेशा पाणी देण्याची सोय करावी.
२) * जीवाणूजन्य मररोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @ ५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून आवळणी घालावी.
३) * जीवाणूजन्य मररोग नियंत्रणासाठी थायफीनेट मिथिल @ ३० ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी.