कांदा करपा व साईज होण्यासाठी

53 दिवसांचा कांदा झाला आहे. 1ली फवारणी फेन्डॉल प्लस+रोडोमील गोल्ड+झिंक लिक्वीड 2 री फवारणी ताकत+क्रॅक्रोन+बायोविटा एक्स 3 री फवारणी 9 दिवसांपूर्वी एम 45+सिवीक+हमला अशी केली आहे.*
शेंडे पिवळे पडत आहे व मान पोसत नाही. 2 -या पाण्याला 18.46.00+मायक्रो न्युट्रेन. 35 दिवसांचा झाल्यानंतर 10.26.26+सल्फर दिले आहे.*

कांदा खत व्यवस्थापन ******

कांदा पिकासाठी हेक्टरी १०० :५० :५० (नत्र, स्पुरद व पालश ) शिफारश केलेली आहे.

एकरी (४० :२०:२०)

पेरणी /पुनर्लागवडी दरम्यान एकरी (२० :२०:२० ,नत्र, स्पुरद व पालश ) म्हणजेच ५० किलो DAP, ४० किलो MOP आणि ४० किलो युरिया पेरणी दरम्यान द्यावे.

उर्वरित २० किलो नत्र म्हणजे ४० किलो युरिया ३० व ४५ दिवसांनी विभागून द्यावे.

रब्बी कांदा पुनर्लागवडी पूर्वी गंधक एकरी@ १५ ते २० किलो या प्रमाणात मातीत मिसळून द्यावे.

3)** कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी ******

१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करपा रोगासाठी अधून मधून रेडोमिल गोल्ड @३० ग्रम + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.