कांदा माना जाड होण्यासाठी कोणती खते टाकावी

48 दिवसांचा कांदा झाला आहे. त्याला लागवडीनंतर 10 दिवसांनी 18.46.0 व 40 दिवसांचा झाल्यानंतर 10.26.26.+सल्फर+मायक्रो न्युट्रेन दिले आहे. शेवटी फवारणी मेन्कोझेब+ट्रायसाय्क्ल्याझोल+क्लोरो हायपर+00.52.34 ची फवारणी केली आहे. 3 दिवसांपूर्वी. कांदा मांड बनण्यासाठी कोणती फवारणी करावी.

कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी ******

१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४) लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

५) कांदा पीक ८० ते १०० दिवसाचे असताना पात खाली पाडून द्यावे त्यामुळे कंद भरणी जलद होते.