अळी उपाय सुचवा जैविक

अळी उपाय सुचवा जैविक, रासायनिक

घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन:
१) पीक २० ते २५ दिवसाचे अवस्थेत असताना निंबोळी अर्क @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.
२) ऑक्टोबर महिन्यात शेतात एकरी @१० कामगंध सापळे लावावे.
३) शेतात टी आकाराचे पक्षी थांबे बसवावे.
४) किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास १ अळी/झाड किंवा ५% घाटे नुकसान
आढळल्यास खालील शिफारस केलेली कीटकनाशकाची फवारणी करावी.
५) एमामेम्क्टीन बेन्झोएट ५% @ ७ ग्रॅम किंवा क्लोराँट्रानिलीप्रोल १८.५% @५ मिली किंवा फ्ल्युबेंडायमाईड
३९.३५ एससी @५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
६) किडीची प्रकोप पाहून घाटे भरणी अवस्थेत दोन फवारणी करावी.

1 Like