गोगल गाय

गोगलगाय आंबा झाडावर जास्त वाढत आहे कसा कंट्रोल करावा?

  • गोगलगाय नियंत्रणात्मक उपाययोजना:

  • सांयकाळी किंवा सकाळी शेतातील गोगलगायी सामूहिकरीत्या गोळा करून मिठाच्या पाण्यात मिसळून माराव्यात. किंवा प्लॅस्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ किंवा चुना टाकून पोत्याचे थोंड बंद करावेत.

  • शेतात ठिकठीकाणी २०-२५ फुटाच्या अंतरावर वाळलेले गवत किंवा पिकांचे अवशेष ढीग घालावे किंवा गोणपाट/पोते गुळाच्या पाण्यात ओले करून ठेवावेत. त्याठिकाणी आश्रयाला आलेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या द्रावणात बुडून नष्ट करावीत.

  • बारीक अवस्थेतील गोगलगाय नियंत्रणासाठी १०% मीठाची (१०० ग्रॅम/लिटर पाणी) या प्रमाणत घेऊन फवारणी केल्यास फायद्याचे दिसून आलेले आहे.

  • फळ पीके भाजीपाला पीके मेटाल्डीहाईड २ किलो/एकर या प्रमाणात घेऊन शेतात पसरून द्यावेत.

  • दहा लिटर पाण्यात २ किलो गुळ + २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबविण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यात थायमीथॉक्झाम २५% ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळून तयार झालेले आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा शेताच्या कडेला पट्टा स्वरुपात टाकावे. आमिष तयार करताना व वापरताना हातमोजेचा वापर करावा.

  • स्वस्तात मस्त व अत्यंत प्रभावी प्रादुर्भाव होत असलेल्या भागात सामूहिकरीत्या गोगलगाय वेचून नष्ट करणे अत्यंत प्रभावी आहे.

  • शेतात वेळोवेळी वनस्पती जन्य कीटकनाशकाची फवारणी करावी जसे कि दशपर्णी अर्क, निबोळी अर्क इत्यादी.

धन्यवाद