आहे.अशा वेळी तूर पिकावर शेंग पोखरणारी हिरवी अळी, पिसारी पतंग व शेंगमाशी या तीनीही शेंग खाणाऱ्या प्रमुख किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.
I)शेंग पोखरणारी कीडचे लक्षणे:
१) अळी पहिल्या अवस्थेत असताना कळी, फुले खाऊन आपली उपजीविका करते, मोठ्या अळ्या शेंगाना छीद्र करून आतील दाणे पोखरून खातात.
II) शेंग माशी:
या किडीचे सुरुवातीला नुकसानीचे लक्षणे कोणतेही शेंगावर दिसत नाही, परन्तु जेव्हा कीड शेंगाच्या सालपटीवर अंडी घालते व पूर्ण वाढ झालेली अळी शेंगाच्या आता राहूनच अर्धवट दाणे पोखरून खाते त्याला बोली भाषेत मुकण किंवा कनक म्हणतो दाणे खाण्यायोग्य राहत नाही.
III) पिसारी पतंग:
अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळ्या, फुले, व शेंगाना छिद्रे पाडून खाते. पूर्ण वाढ झालेली अळी शेंगाचा पृष्ठभाग खरडून खाते व नंतर शेंगाच्या बाहेर राहून शेंग पोखरून खाते.
वरील सर्व किडीचे एकत्रित व्यवस्थापन:
१) पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) सप्टेंबर महिन्यात शेतात एकरी @१० कामगंध सापळे लावावे.
३) शेतात टी आकाराचे पक्षी थांबे बसवावे.
४) किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास १ अळी/झाड किंवा ५% शेंगावर प्रादुर्भाव आढळल्यास खालील शिफारस केलेली कीटकनाशकाची फवारणी करावी.
५) एमामेम्क्टीन बेन्झोएट ५% @१० ग्रॅम किंवा क्लोराँट्रानिलीप्रोल १८.५% @५ मिली किंवा फ्ल्युबेंडायमाईड ३९.३५ एससी @५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
६) किडीची प्रकोप पाहून शेंग भरणी अवस्थेत दोन फवारणी करावी.