मकेची पेरणी 5 ऑक्टोबर ला केली आहे. त्याला पेरणी पूर्वी 10 गुंठेसाठी 300 किलो गांडूळ खत टाकले आहे. त्यानंतर कोणतेही खत टाकले नाही. फक्त गांडूळ पाणी ची फवारणी केली आहे आणि दशपर्णी अर्क आणि मेटा ची दुसरी फवारणी केली आहे. 31 ऑक्टोबर ला 50 लिटर जीवांमृत तयार करायला ठेवलेय. आणि 50 लिटर गांडूळ पाणी उपलब्ध आहे तर दोन्ही एकत्र पाण्याच्या पाळी सोबत सोडले तर चालेल का आणि त्या सोबत युरिया टाकला तर चालेल का? त्याच सोबत खताची मात्र घ्यावी का याबाबत सल्ला मिळावा.
जीवामृत व गांडूळपाणी पाट पाण्याबरोबर देऊ शकता…
युरिया ८ दिवसाच्या अंतराने एकरी @२० किलो सोबत DAP किंवा १०:२६:२६ उपलब्ध असेल तर @२५ किलो मातीत मिसळून देऊ शकता.