व्यवस्थापन:
रोपाची लागवड करताना पाण्याचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होणारी जागा निवडावी.
मुख्य शेतात पुनर्लागवड करण्यापूर्वी एकरी @१०० किलो गांडूळ खत सोबत ४ किलो ट्रायकोड्रामा व्हीरीडी मातीत मिसळून द्यावे.
१)ट्रायकोड्रामा व्हीरीडी पावडर @१ किलो नर्सरीत शेणखतात मिश्रण करून द्यावे.
२) नर्सरी अवस्थेत बुरशीजन्य रोगांचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी बिनोमील @२० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३)५-६ दिवसाच्या अंतराने मिथोमिल @३५ ग्रॅम अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like