12 दिवसाचा कांदा आहे कोणती फवारणी करावी?

खते कोणती वापरावी?
कांदा

4 Likes

नर्सरी अवस्थेत बुरशीजन्य रोगांचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी बिनोमील @२० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर ५-६ दिवसांनी ट्रायकोड्रामा व्हीरीडी पावडर @१ किलो नर्सरीत शेणखतात मिश्रण करून द्यावे.

५-६ दिवसाच्या अंतराने मिथोमिल @३५ ग्रॅम असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मुख्य शेतात पुनर्लागवड करण्यापूर्वी एकरी @१०० किलो गांडूळ खत सोबत ४ किलो ट्रायकोड्रामा व्हीरीडी मातीत मिसळून द्यावे.