तुर आहे आता मला फवारणी करायची आहे

माझी तूर आहे आता मला फवारणी करायची आहे तर आता फूल येतील औषध आणायचे

तूर पिकात सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबर महिन्यात मर रोगाची प्राथमिक लक्षणे दिसतात व पिक फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी प्रादुर्भाव वाढतो.

व्यवस्थापन:

  • ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड @१०० मिली याप्रमाणात आळवणी घालावी.
  • अंतरप्रवाही बुरशीनाशक जसे कि, कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5% DS (विटावॅक्स पॉवर) किंवा प्रोपीकोनॅझोल २५% (टील्ट)@३०० मिली किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% (ब्लू कॉपर, बिल्टॉक्स) @ ५०० ग्रॅम सोबत ह्युमिक अॅसिड @१ ली./२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड/१०० मिली या प्रमाणात घेऊन बुडाशी आळवणी घालावी.

फुले अवस्थेतील उपाययोजना

१ ) चांगला फुलोरा करिता आता तूर पिकात ०.५२.३४ विद्रावे खत @१०० ग्रॅम + बायोवीटा @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) कीड व्यवस्थापन करिता शेतात पक्षी थांबे @२० लावावे.
३) पिकांचे निरीक्षण करून वेळोवेळी आवश्यक ते उपयोजना कराव्यात.