तुरी ला फुल येतांनी कोणती काळजी घ्यावी

फुलोरा चांगला येण्यासाठी व फुलांचे शेंगात रूपांतर होण्या साठी कोणती।काळजी घ्यावी!

2 Likes

तूर पिकात सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबर महिन्यात मर रोगाची प्राथमिक लक्षणे दिसतात व पिक फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी प्रादुर्भाव वाढतो.

व्यवस्थापन:

  • ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड @१०० मिली याप्रमाणात आळवणी घालावी.
  • अंतरप्रवाही बुरशीनाशक जसे कि, कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5% DS (विटावॅक्स पॉवर) किंवा प्रोपीकोनॅझोल २५% (टील्ट)@३०० मिली किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% (ब्लू कॉपर, बिल्टॉक्स) @ ५०० ग्रॅम सोबत ह्युमिक अॅसिड @१ ली./२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड/१०० मिली या प्रमाणात घेऊन बुडाशी आळवणी घालावी.
1 Like

१ ) चांगला फुलोरा करिता आता तूर पिकात ०.५२.३४ विद्रावे खत @१०० ग्रॅम + बायोवीटा @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) कीड व्यवस्थापन करिता शेतात पक्षी थांबे @२० लावावे.
३) पिकांचे निरीक्षण करून वेळोवेळी आवश्यक ते उपयोजना कराव्यात.

1 Like

मनस्वी आभार