कंद कुजं

आले पिकाला कंद कुज , सड लागली काय करावे

आले पिकावरील कंद कुजचे करणे व व्यवस्थापन:

अद्रक पिकावरील कंद कुज विविध प्रकाराने होऊ शकते. त्यात बुरशीजण्य, जीवाणूजण्य,आणि कीड लागून त्या ठिकाणी संधीसाधू बुरशीची वाढ होऊन कंदकुज होते.

व्यवस्थापन:
१) शेतात एक - दोन ठिकाणी कंद कुज दिसताच क्षणी विद्राये खताचं शेड्यूल चालू असेल तर त्वरित बंद करावे.
२) बुरशीजण्य, जीवाणूजण्य मर रोग दिसताच क्षणी रोगग्रस्त झाडे काढून त्या ठिकाणी स्पॉट आळवणी करावी.
३) मररोगग्रस्त असलेल्या ठिकाणी बेड मध्ये आडवा चर पडून द्यावा म्हणजे जमिनी मार्फत बुरशी पसरणार नाही.
४) बुरशीजण्य, जीवाणूजण्य शेतात १-२ ठिकाणी आढळून आल्यास त्वरित ट्रायकोड्रामा एकरी@४ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
टीप: अद्रक पिकात रोगग्रस्त स्पॉट दिसत नसल्यास सुद्धा वरील नियोजन करावे.
५) बुरशीजण्य, जीवाणूजण्य एकत्रित नियंत्रण करिता thifluzamide २४ एससी @५०० मिली + रेडोमिल गोल्ड १ किलो + हमला ५०० मिली/२०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी.
६) HCL (हायड्रोक्लोरिक असिड)@२.५ लिटर/ एकर आळवणी घालावी(शेतकरी अनुभव).
७) शेतात पाणी जास्त काळ साचून राहत असल्यास त्वरित काढून देण्याची सोय करावी.
८) ज्या मातीचा सामू ६ ते ७.५ दरम्यान आहे त्या जमिनीत कंदकुजचे प्रमाण कमी आढळून येतात.