fizoriyam vilt sathi upay konta
टोमॅटो पिकात फुझारीयम मर रोग बरोबर जीवाणू जण्य रोगाची लक्षणे दिसतात.
24 तासाच्या वर झाड ओले असल्यास ह्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसुन येतो.
प्रतिबंधक उपाययोजना
१) टोमॅटो पिक ४-५ दिवसापूर्वी लागवड केलेली असल्यास बॅसिलस @५०० मिली + सुडोमोनास १ किलो + ट्रायकोडर्मा १ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी. (हीच आळवणी २०-२५ दिवसाच्या अंतराने घ्यावी).
२) पिक १०-१५ व ३०-३५ दिवसाच्या अंतराचे असताना मायकोराईझा @५०० ग्रॅम/ २०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी.
२) शेतात ४-५ झाडे वाळलेली दिसल्यास त्वरित कोसाईड ( Copper Hydroxide 53.8%)+ @४०० मिली + व्हलीडामायसीन @५०० मिली/२०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी.
३) ड्रीप मधून मुळी ॲक्टीव होऊन अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी थायोग्रिन @ 3 किलो प्रति एकर सोडावे.
४) अँटिबायोटिक्स जसे की स्ट्रेप्टोसायकलिन/व्हॅलिडामायसिन/कासुगामायसिन यांचा वापर 20 ते 25 दिवसाच्या अंतरानेच करावा.