खत व्यवस्थापन

तूर पिकासाठी कंपोस्ट खत वापरावे का त्याच्या बरोबर कोणते खत वापरावे

१) कंपोस्ट खत उपलब्ध असल्यास एकरी @२०० किलो + नंतरच्या अवस्थेतील मर रोग नियंत्रण करिता आत्ताच ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२ किलो/एकर या प्रमाणात घेऊन मातीत मिसळून द्यावे. व नंतर अंतरमशागत करावी.

२) उत्पन्न वाढीसाठी तूर पिकाची शेंडे खुडणी करावी. शेंडे खुडणी पेरणीनंतर ३५,५५ आणि ८० दिवसांनी करावी. दोन खुडणीचे अंतर २५ ते ३० दिवस ठेवावे.

1 Like

तुर वाढीसाठी तूर वाढीसाठी आणि आळी साठी सेंद्रिय मधून कुठल्या औषध घ्यावे

पिकांच्या जोमदार वाढीसाठी अमृतपाणी @१५० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सध्याच्या अवस्थेत तूर पिकावर पाने गुंडाळणारी किडीचे लक्षणे आढळतात. पाने गुंडाळणारी अळी नियंत्रण करिता निंबोळी तेल @३० मिली किंवा दशपर्णी अर्क @१५० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.