कोणती फवारणी करावी?

पानावर अशी आळी पडली कोणते औषध फवारावे ?

भरत जी या अळी ला तंबाखू वरील पाणे खाणारी(Spodoptera litura) अळी म्हणतात.
या अळी साठी एकात्मिक नियंत्रण करणे खूप महत्वाचे आहे.
१) डोळ्यांनी दिसणाऱ्या मोठी अळी हाताने वेचून नष्ट करावी.
२) ही अळी पूनजक्यात अंडी घालते , पुनजक्यात घातलेल्या अंडी ग्रस्त पान हाताने वेचून नष्ट करावी.
किडींच्या पतंग आकर्षित करण्यासाठी व एकात्मिक प्रतिबंधासाठी हेक्टरी @२० कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
किडची संख्या आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल (१०% प्रादुर्भाव ग्रस्त झाडे) तर खालील रासायनिक कीडनाशकाचा वापर करावा.
Profenophos ५०%@ ३० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
किंवा Chloropayriphos २५% ec @३० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

बाजूच्या शेतामध्ये सोयाबीन किंवा एरंडी पीक आहे का?

बाजूच्या शेतात सोयाबीन पिक आहे

सचिन जी ठीक आहे